आकाश आवटे यांची मि. अशिया आणि मि. वल्ड 2018 स्पर्धेसाठी निवड
पुणे (सह्याद्री बुलेटीन) - बालेवाडी येथे ऑक्टोबर 2018 मध्ये होणाऱ्या मि. आशिया बॉडी बिल्डिंग आणि फिजिक चॅम्पियनशीप स्पर्धा 2018 यासाठी पिंपरी चिंचवडचे आकाश आवटे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच थायलंड येथे होणाऱ्या मि.वल्ड स्पर्धेतही त्यांचा सहभाग आहे.
इंडियन बॉडी बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून छत्तीसगड येथील रायपूर मध्ये टीम इंडियाची निवड करण्यात आली, तर महाराष्ट्र टीमची निवड वाकड येथे झाली.

आकाश आवटे यांनी 80 पेक्षा जास्त स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून 47 पुरस्कार आणि 26 मेडल वरती आपलं नाव कोरलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्र बेस्ट पोझर टायटल 2017, वाशी महापौर श्री बेस्ट पोजर टायटल 2015 आणि 2017 अशा अनेक स्पर्धांमधून आवटे यांनी विजय प्राप्त केलेला आहे.
एका सामान्य कुटुंबातून असामान्य कर्तृत्व दाखवणारे आकाश आवटे यांना "मिस्टर वल्ड" निलेश बोंबले प्रशिक्षण देत आहेत. त्यांचे "वर्कआउट पार्टनर" विशाल मोरे आहेत.
यांच्यासह आय.बी.बी.एफ चे पदाधिकारी चेतन पठारे , वरूण श्रीनिवासन, शरद मारणे, महेश गणगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि infiniteworx यांच्या सहकार्याने, ही यशस्वी घोडदौड करत असल्याचे आवटे यांनी सांगितले.
